आपला जिल्हाआरोग्यताज्या घडामोडी

गडचिरोली सामान्य रुग्णालयात स्थानिक अनुभवी डॉक्टरांची जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून नियुक्ती करा

बीआरएसपीचे मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना निवेदन

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार अधिक प्रभावीपणे चालविण्यासाठी जिल्ह्यात दीर्घकाळ सेवा बजावलेल्या अनुभवी स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांची जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे यांनी मुख्यमंत्री व गडचिरोलीचे पालकमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात गडचिरोलीसह चंद्रपूर, भंडारा तसेच छत्तीसगड राज्यातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी येतात. दुर्गम व बहुभाषिक भागातील रुग्णांना स्थानिक परिस्थितीची माहिती असलेल्या अनुभवी डॉक्टरांकडून उपचार मिळणे महत्त्वाचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

महिला रुग्णालयासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची मागणी

गडचिरोली येथील वैद्यकीय महाविद्यालयाला जिल्हा सामान्य रुग्णालय व महिला रुग्णालय जोडलेले असल्याने वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टरांची टीम महिला रुग्णालयात नियमित रुग्णसेवेसाठी नियुक्त करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच गडचिरोली महिला रुग्णालयात कार्यरत तज्ज्ञ डॉक्टरांची अहेरी येथील महिला रुग्णालयात नियमित सेवेसाठी नियुक्ती केल्यास दक्षिण गडचिरोलीतील महिला व बालमृत्यू कमी करण्यास मदत होऊ शकते, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक निर्णय घ्यावा, अशी विनंती बीआरएसपीचे जिल्हाध्यक्ष तथा विदर्भ कमिटी सदस्य मिलिंद बांबोळे यांनी केली आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker