चांदा शिक्षण मंडळ, चंद्रपूरद्वारा संचालित वसंत विद्यालय, गडचिरोली येथे मुख्याध्यापिका सौ. सुचिता कामडी यांच्या मार्गदर्शनाखाली नशामुक्त भारत अभियानांतर्गत व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोलीचे उपअधिष्ठाता डॉ. निर्मल चन्ने यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगत व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. तसेच अभ्यास व जीवनातील यशासाठी मनाची एकाग्रता कशी वाढवावी, याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक राजाभाऊ सोनटक्के, प्रेमभाई, मंडळाचे सदस्य सतीश धाईत तसेच पर्यवेक्षक प्रभाकर मंदूरकर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन उदय धकाते यांनी केले, तर संजय वरखडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शिक्षक विद्यानंद चहांदे, अनिलकुमार पुरी, मेघश्याम लांजेवार, मीरा बिसेन, तिलोत्तमा सुरपाम, पूजा निखाडे, प्रियंका बनकर, शितल धकाते, त्रिवेणिका सोनवणे, दीपक सहारे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी सचिन धकाते व विभा गावतुरे उपस्थित होते.
इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच निरोगी व सकारात्मक जीवनशैलीचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.