गडचिरोली, प्रतिनिधी :-
फुले वार्ड, गडचिरोली येथील आम्रपाली बुद्ध विहारात सोमवार, २१ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजता वर्षावास प्रवचनमालेतील १९वे प्रवचन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. ‘महाबोधी महाविहाराचा खरा इतिहास’ या विषयावर भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा कोषाध्यक्ष आद. लहू रामटेके यांनी प्रवचनातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
बोधगया येथील महाबोधी महाविहाराचा इतिहास सांगताना रामटेके यांनी सम्राट अशोकाच्या काळापासूनच्या महाविहाराच्या इतिहासावर प्रकाश टाकला. तसेच सम्राट अशोक, राजा कनिष्क, राजा बृहद्रथ, भंते अनागारिक धम्मपाल आणि अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या कार्याची व महाबोधी महाविहाराशी संबंधित इतिहासाची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वयोवृद्ध उपासिका आयुनी ताराबाई मुरमाडकर होत्या. यावेळी आयुनी प्रभाताई बांबोळे, आयुनी विभाताई खेवले, आयुनी पुष्पा गेडाम, आयुनी लताताई गोवर्धन यांच्यासह मोठ्या संख्येने उपासिका उपस्थित होत्या.
प्रवचनानंतर सरणत्तय घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
Back to top button