आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

१८४३ किमी सायकल प्रवास करणाऱ्या निलेश गुरुनुलेचा सायकल स्नेही मंडळातर्फे सन्मान

१३ दिवसांचा जिद्दी प्रवास; सायकलप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली शहरातील हनुमान वॉर्ड येथील वृत्तपत्र वितरक निलेश विलास गुरुनुले या युवकाने केवळ जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर गडचिरोली ते केदारनाथ धाम असा तब्बल १८४३ किलोमीटरचा सायकल प्रवास १३ दिवसांत पूर्ण केला. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सायकल स्नेही मंडळ, गडचिरोली यांच्या वतीने १३ ऑगस्ट रोजी सायकल भेट व विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

निलेश गुरुनुले याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सायकलवरून केलेला हा प्रवास अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. त्याच्या जिद्दीचे आणि धाडसाचे कौतुक करण्यासाठी सायकल स्नेही मंडळाच्या वतीने हा विशेष उपक्रम मान्यवारांच्या उपस्थिती मध्ये आयोजित करण्यात आला आहे.

हा सत्कार समारंभ १३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता वसंत विद्यालय, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी निलेश गुरुनुले यांना सायकल भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

“आपली उपस्थिती व सहकार्य एका जिद्दी सायकलपटूच्या पुढील प्रवासाला नवी दिशा देईल,” असे आवाहनही मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला बंडोपंत बोढेकर, प्रा. विलास पारखी, उदय धकाते, सौ. मीरा चौधरी, सौ. सुचिता कामडी, श्री. मुरलीधर दोनाडक, प्रा. अरुण पालारपवार, डॉ. चंद्रकांत लेनगुरे, प्रा. उल्हास आखाडे, उपेंद्र द्रोहणकर, डॉ. योगेश पाटील, प्रा. संतोष संगनवार, प्रा. ज्ञानेश्वर धकाते, माधुरी बागडे बोरकर, श्री. साळवे (बल्लारपूर), श्री. वैभव बारेकर, डॉ. शुभम मोंढे, सौ. प्रा. सुनिता विजय साळवे आणि भाविक ठक्कर आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

सायकलप्रेमी, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जिद्दी सायकलपटूला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन उदय धकाते, जिल्हा सरचिटणीस, सायकल स्नेही मंडळ, गडचिरोली यांनी केले आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker