अपघातताज्या घडामोडी
ब्रम्हपुरी जवळ कोर्धा येथे भीषण अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू
ब्रह्मपुरी, प्रतिनिधी :-
ब्रह्मपुरीपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोर्धा गावात आज रात्री सुमारे ९.३० वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडून दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही युवक दुचाकीवरून प्रवास करत असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.




