ताज्या घडामोडीदेश विदेश
शहीद कमांडो दीपक मडावी यांना शासकीय मानवंदना

गडचिरोली, प्रतिनिधी :-
अबुजमाड जंगल परिसरातील नक्षलविरोधी कारवाईत वीरगती प्राप्त झालेले सी-६० कमांडो दीपक चिन्ना मडावी यांना गडचिरोली पोलीस मुख्यालयात शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली. यावेळी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवानास अंतिम सलामी देण्यात आली.
श्रद्धांजली कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस अधिकारी व प्रशासकीय मान्यवर उपस्थित राहून पुष्पचक्र अर्पण केले. शहीद मडावी यांच्या बलिदानाचे स्मरण करत त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात प्रशासन व पोलीस दल पाठीशी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
शहीद मडावी यांचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी अहेरी तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी दामरंचा येथे रवाना करण्यात आले. अबुजमाडमध्ये माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आले.



