क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

अंडर-१९ विश्वचषक अंतिम सामना : भारताचा धावांचा डोंगर

वैभव सूर्यवंशीची १७५ धावांची वादळी खेळी

क्रीडा प्रतिनिधी :-

झिम्बाब्वेतील हरारे येथे सुरू असलेल्या अंडर-१९ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडसमोर धावांचा मोठा डोंगर उभारला आहे. सलामीवीर वैभव सूर्यवंशीच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना ४८ षटकांत ८ बाद ३८५ धावा केल्या.

वैभव सूर्यवंशीने अवघ्या ८० चेंडूत १५ चौकार आणि १५ षटकारांच्या मदतीने दमदार १७५ धावा ठोकत इंग्लंडच्या गोलंदाजांचा अक्षरशः समाचार घेतला. त्याला कर्णधार आयुष म्हात्रेने ५३ धावांची तर अभिज्ञान कुंडूने ४० धावांची महत्त्वपूर्ण साथ दिली.

भारताकडून कनिष्क चौहान आणि हेनिल पटेल हे शेवटपर्यंत मैदानावर ठाम राहून संघाचा डाव भक्कम करण्यास यशस्वी ठरले. भारताने उभारलेल्या भक्कम धावसंख्येमुळे अंतिम सामन्यात इंग्लंडसमोर विजयासाठी मोठे आव्हान उभे राहिले आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker