नवी दिल्ली, प्रतिनिधी :-
मेघालयातील ईस्ट जयंतीया हिल्स जिल्ह्यातील कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात १८ कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक कामगार जखमी झाले आहेत. काही कामगार अद्याप खाणीत अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, खाणीत डायनामाईटचा स्फोट झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून अडकलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून मृत कामगारांच्या वारसांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.
Back to top button