आपला जिल्हाताज्या घडामोडी

उन्हाळी परीक्षा २०२६ : सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही अनिवार्य

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व परीक्षा केंद्र महाविद्यालयांना उन्हाळी २०२६ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यापीठाकडून परीक्षा नियोजनाची प्रक्रिया सुरू असून, सर्व परीक्षा केंद्र असलेल्या महाविद्यालयांनी वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यासंदर्भातील फुटेज अहवाल सॉफ्ट व हार्ड कॉपी स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे. हा अहवाल director.boee@unigug.ac.in व preexamsgug@gmail.com या ईमेलवर दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सीसीटीव्ही कॅमेरे न बसविणाऱ्या परीक्षा केंद्रांबाबत परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सर्व परीक्षा केंद्र महाविद्यालयांनी दिलेल्या मुदतीत सीसीटीव्ही बसवून त्याचा अहवाल सादर करावा, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ. प्रवीण पोटदुखे यांनी केले आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker