ताज्या घडामोडीदेश विदेश

गडचिरोलीत ७ जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा

अबुजमाड सीमेवर सुरक्षा दलांची मोठी कारवाई

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्र–अबुजमाड सीमेलगतच्या दुर्गम जंगल परिसरात गडचिरोली पोलीस आणि सी-६० कमांडोंनी राबविलेल्या नक्षलविरोधी संयुक्त कारवाईत ७ जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या सर्व नक्षलवाद्यांवर शासनाने एकूण ७१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सी-६० कमांडो आणि सुरक्षा दलांनी तीन दिवसांपासून अबुजमाड सीमेवरील जंगल परिसरात सघन शोधमोहीम सुरू केली होती. दरम्यान, सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत ७ नक्षलवादी ठार झाले. कारवाईदरम्यान घटनास्थळावरून एके-४७, एसएलआरसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, दारूगोळा व नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

ही कारवाई सुरक्षा दलांसाठी मोठे यश मानली जात असून, अबुजमाड परिसरातील नक्षलवादी हालचालींना मोठा आळा बसणार असल्याचेही पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू असून, आणखी नक्षलवादी असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

या कारवाईमुळे गडचिरोली जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यास मदत होणार असून, स्थानिक नागरिकांमध्येही सुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. पुढील तपास आणि शोधमोहीम सुरू असून, या संदर्भात अधिक माहिती लवकरच देण्यात येणार आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker