ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मुंबई महापालिकेच्या महापौरपदी सुजाता पाटील; उपमहापौरपदी दशरथ भगत बिनविरोध निवड

विरोधकांचे अर्ज मागे; भाजपाला अतिरिक्त पाठिंबा

मुंबई,प्रतिनिधी :-

नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या सुजाता पाटील तर उपमहापौरपदी दशरथ भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे नवी मुंबईच्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात भाजपाचे वर्चस्व अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे.

महापौर व उपमहापौर निवडीसाठी आज महापालिका मुख्यालयात विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. महापौर पदासाठी शिवसेनेच्या सरोज पाटील तर उपमहापौर पदासाठी आकाश मडवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, दोघांनीही आपले अर्ज मागे घेतल्याने भाजपाच्या उमेदवारांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

याशिवाय शिवसेना (उबाठा) पक्षाचे दोन नगरसेवक, मनसेचा एक नगरसेवक तसेच एका अपक्ष नगरसेवकाने भाजपाला पाठिंबा दिल्याने या निवडीला अधिक राजकीय बळ मिळाले.

नवीन महापौर सुजाता पाटील आणि उपमहापौर दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई शहराच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker