ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ३१ व्या दीक्षांत समारंभात १.२४ लाख विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

मुंबई, प्रतिनिधी :-
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ३१ व्या दीक्षांत समारंभात सुमारे एक लाख २४ हजार विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. या भव्य समारंभात विविध अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

या दीक्षांत समारंभाला माजी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. निर्मलजीत सिंह कलसी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनावणे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

समारंभात ७७ दृष्टिबाधित विद्यार्थी, कारागृहातील ६८ बंदिजन विद्यार्थी तसेच ११ सुवर्णपदक विजेते विद्यार्थी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. कलसी यांनी सांगितले की, “बदलत्या काळात केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून, विद्यार्थ्यांनी कौशल्याधारित शिक्षण आत्मसात करणे अत्यावश्यक आहे.”

या दीक्षांत समारंभातून मुक्त विद्यापीठाच्या समावेशक व समाजाभिमुख शिक्षणाची भूमिका अधोरेखित झाली.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker