गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली विधानसभा मतदार क्षेत्रातून काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते अडव्होकेट विश्वजित मारोतराव कोवासे यांची उमेदवारी बाबत स्वतः खासदार राहुल गांधी यांनी माघार घेण्यासाठी विनंती केल्यामुळे अखेर काँग्रेसचे बंड शमवण्यात यश आले असून ते आज उमेदवारी मागे घेणार आहेत. अशी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती महाभारत न्यूज ला प्राप्त झाली आहे.
काँग्रेस मधील बंड अखेर शमविण्यात स्वतः काँग्रेस नेते राहुल गांधी सह श्रेष्टीं अशोक गहलोत, भूपेंद्र बघेल, नाना पटोले, कुणाल चौधरी यांना गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रात तिकीट देतांना चूक झाल्याची जाणीव झाली. याची गंभीर दखल काँग्रेस पक्षाने घेतली आहे. मागील ७ वर्षापासून विधानसभा क्षेत्रात गाव पातळी वर काँग्रेसपक्षाच्या कठीण काळात कार्यकर्तेना सोबत घेऊन चालणारे व त्यांच्या अडचणी च्या वेळी मदत करणारे विश्वजीत कोवासे यांचे अर्ज मागे घेण्यासाठी यश मिळाले आहे.या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमात होते.
गडचिरोली विधानसभा क्षेत्राला काँग्रेसचा बालेकिल्ला करणारे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान नेते माजी आमदार तथा माजी खासदार मारोतराव कोवासे यांचे पुत्र अडव्होकेट विश्वजीत कोवासे आमदार पदाच्या अग्रस्थानी शर्यतीत होते. परंतु त्यांना तिकीट नाकारल्याने त्यानी बंडाचा पवित्रा घेऊन जोरदार धक्का देत पक्षा तर्फे व नंतर अपक्ष अर्ज दाखल करून खळबळ उडवून दिली.यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले.
काँग्रेसचे निष्ठावान नेते कोवासे यांच्या सोबत श्रेष्टी कुणाल चौधरी यांनी पक्षाच्या वतीने यशस्वी शिष्टाई केल्याने उमेदवार अर्ज मागे घेण्याचा निर्णय कोवासे यांनी घेतल्याचे त्यांच्या निकटवर्तीय यांनी आज महाभारत न्यूज ला सांगितले.
आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून दुपारी ३ वाजता नंतर कोण कोण माघार घेणार हे स्पष्ट होणार आहे.
Back to top button