ताज्या घडामोडी

पोलीस–नक्षल चकमक प्रकरणी दंडाधिकारीय चौकशी

पोलीस–नक्षल चकमक प्रकरणी दंडाधिकारीय चौकशी; नागरिकांना माहिती सादर करण्याचे आवाहन

गडचिरोली, प्रतिनिधी :—

पोलीस स्टेशन गट्टा, पोलीस उपविभाग एटापल्ली अंतर्गत मौजा–मोडस्के जंगल परिसरात दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या पोलीस–नक्षल चकमकीदरम्यान २ महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह शस्त्रासह आढळून आले होते. या घटनेतील मृत व्यक्तींच्या मृत्यूची कारणे निश्चित करण्यासाठी सदर प्रकरणात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९६ अन्वये दंडाधिकारीय चौकशी करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर, या घटनेबाबत प्रत्यक्ष माहिती असलेल्या तसेच चौकशीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आपले लेखी निवेदन शपथपत्रासह उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली यांच्या न्यायालयात, जाहीर सूचनेच्या प्रसिद्धीपासून १५ दिवसांच्या आत किंवा तत्पूर्वी कार्यालयीन वेळेत सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

निवेदनात घटनेचे प्रत्यक्ष वर्णन, या घटनेबाबतचा वैयक्तिक अनुभव, घटनेपूर्वी अथवा नंतर घडलेल्या संबंधित घटनांची माहिती, तसेच या प्रकरणाशी निगडित शासकीय अथवा इतर यंत्रणांची प्रतिक्रिया किंवा सहभागाबाबतची माहिती नमूद करावी, असे उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली यांनी कळविले आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker