देश विदेश
मोदी वडसा आमगांव,व चांदाफोर्ट रेल्वे स्टेशन चे उद्घाटन करणार
खा.अशोकजी नेते यांच्या प्रयत्नाला यश
गडचिरोली,प्रतिनिधी :-
अमृत भारत स्टेशन स्कीम मध्ये वडसा (देसाईगंज), आमगांव,व चांदाफोर्ट या रेल्वे स्टेशन चा समावेश या भूमीपूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रिय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे आभासी पद्धतीने करणार उदघाटन करणार आहे.
जिल्हातील एकमेव रेल्वे स्टेशन वडसा(देसाईगंज) आहे.या स्टेशनवरून नागरिकांची रहदारी मोठया प्रमाणात चालते. यासाठी रेल्वे संबंधित नेहमी सतत सातत्याने गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते यांनी अनेक रखडलेले प्रश्न मार्गी लावलेले आहेत. त्या बरोबर च नव्या बजेट नुसार आलेल्या अमृत भारत स्टेशन स्कीम मध्ये वडसा (देसाईगंज),आमगांव व चांदाफोर्ट या महत्वाच्या रेल्वे स्टेशन चा विकास होणार आहे, त्या बरोबरच नागरिकांना आधुनिक सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहेत.
वडसा स्टेशनचा पुनर्विकास खर्च: १८.४ कोटी आहे.
वडसा (देसाईगंज), आमगांव,व चांदाफोर्ट या रेल्वे स्टेशनचा भूमीपूजन मान.पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रिय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते दि.०६ ऑगस्ट २०२३ ला.सकाळी:-०९ .०० वा.च्या दरम्यान आभासी पद्धतीने होणार आहे.यासाठी भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार अशोकजी नेते यांनी केले आहे.

अमृत भारत कार्यक्रमासाठी
पंतप्रधानांनी गेल्या ९ वर्षात सातत्याने प्रशंसनीय आणि ऐतिहासिक विकास कामे केली आहेत. या संदर्भात,०६ ऑगस्ट २०२३ रोजी माननीय पंतप्रधान देशातील ५०६ रेल्वे स्थानकांसाठी “अमृत भारत” कार्यक्रमांतर्गत कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.



