आपला जिल्हा

कोया किंग व कोया क्वीन फॅशन स्पर्धेत योगीताताई पिपरे यांचा सत्कार

गडचिरोली,प्रतिनिधी :-

    जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी महिला फेडरेशन गडचिरोली, नारी शक्ती संघटना व विविध आदिवासी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथील सुमानंद सभागृहात आदिवासी संस्कृतीवर आधारित कोया किंग आणि कोया क्वीन फॅशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमात नारी शक्ती संघटनेच्या  वतीने पदाधिकाऱ्यांचा हस्ते गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांचा सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाचे उदघाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मा. ना. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष निमंत्रित अतिथी म्हणून मराठी चित्रपटातील सिने अभिनेत्री तृप्ती भोईर प्रामुख्याने उपस्थित होत्या.

प्रमुख अतिथी म्हणून आम डॉ देवरावजी होळी, माजी आमदार हरिरामजी वरखडे, गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, जीपच्या माजी सभापती भाग्यश्रीताई आत्राम, काँग्रेस चे महासचिव डॉ नामदेव किरसान, जि प चे माजी कृषी सभापती नानाभाऊ नाकाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, दै देशोन्नती चे जिल्हा प्रतिनिधी प्रा अनिल धामोडे, हितवाद चे जिल्हा प्रतिनिधी रोहिदास राऊत उपस्थित होते.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker