जेष्ठ लेखक,वक्ते प्रा. हरी नरके यांचे निधन

मुंबई,विशेष प्रतिनिधी :-
जेष्ठ लेखक, विचारवंत, अभ्यासू, संशोधक, रोखठोख वक्ते आणि मराठी ब्लॉगर म्हणून ओळखले जाणारे प्रा. हरी नरके (वय वर्ष ६०) यांचे आज बि.के.सी. येथील एशियन हार्ट रुग्णालयात हृदयविकाराने दुःखद निधन झाले.
प्रा. हरी नरके हॆ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते. बहुजनवादी समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. फुले व आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करणे आणि शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घडून आणण्यामध्ये हरी नरके यांचा मोलाचा वाटा आहे.
काही वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठ शैक्षणिक कर्मचारी कल्याणकारी संघटना तसेच मुंबई विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा केलेला महामानवांच्या संयुक्त जयंती उत्सव सोहळ्यास प्रा. हरी नरके हॆ विशेष उपस्थिती आणि वक्ते म्हणून हजर होते. प्रा. हरी नरके यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण बहुजनांमध्ये शोककळा पसरली आहे.



