गडचिरोली,प्रतिनिधी :-
आज दिनांक ९ ऑगस्ट २०२३ रोजी आदिवासी परधान समाज मंडळ गडचिरोली येथील समाजाच्या वास्तूमध्ये ९ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन समाज बांधव व वार्डातील नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सर्वप्रथम भगवान बिरसा मुंडा, क्रांतिवीर बाबुराव शेडमाके, समाजाचे प्रेरणास्थानतथा जिल्हयाचे शिल्पकार स्व. बाबुरावजी मडावी यांच्या प्रतिमांना समाज मंडळाचे अध्यक्ष श्री प्रदीप मडावी, महेंद्र मसराम, रुपेश सलामे,विजय सुरपाम, सुधीर मसराम,अमोल मेश्राम, मानसिंग सुरपाम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाजातील क्रांतिकारी यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांचा आदिवासी समाजाप्रती बहुमोल त्यागाची आठवण समाज बांधवांना करून दिली. आदिवासी दिवस साजरा करण्याचे संयुक्त राष्ट्र संघाने 9 ऑगस्ट १९९४ रोजी घोषित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखित संविधानात आदिवासी समाजाच्या विकासासाठी तरतूद करण्यात आली. जेणेकरून आदिवासी जमात विकासाच्या प्रवाहात आदिम जमातीच्या सर्वांगिक विकास करून देण्याचा प्रगतीत खारीचा वाटा उचलावा असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
आदिवासी एकता… जिंदाबाद….
“एक तिर एक कमान..सारे आदिवासी एक समान….” अश्या नारेबाजी करत मोठा उत्साहात जागतीक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी अजय सुरपाम, उपाध्यक्ष संजय मेश्राम,रोहित आत्राम, साहिल गोवर्धन, अजय सिडाम, नंदू कुंभारे,आकाश कुळमेथे, साहिल शेडमाके, अंकित कुळमेथे, ताजिसा कोडापे, माणिक आत्राम,अमोल कुळमेथे, राज डोंगरे, जयंत मोरे,गिरीष उईके, एम. नैताम, प्रकाश कोडाप, प्रफुल कोडाप,सुरेश चिकराम, अभी मडावी,सुरेश मेश्राम, बंडू रयसिडाम, अजय काळे,महादेव कांबळे, महेंद्र सिडाम, अशोक नरोटे यांच्यासह इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे संचालन युवा सदस्य रुपेश सलामे यांनी केले
Back to top button