औरंगाबाद,प्रतिनिधी :-
आज जागतिक आदिवासी दिनी अनुसूचित जमातीच्या खऱ्या ठाकूराला वैधता देण्याचे आदेश मा. उच्च न्यायालय औरंगाबाद कडून कडून देण्यात आला आहे. या निर्णयामुळे ठाकूर जमातीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अर्जदार नीलकंठ वासुदेव ठाकूर. रिट याचिका क्रमांक 6157/2021 यांचे घरात कोणाचीही वैधता प्रमाणपत्र नसताना केवळ 1950 पूर्वीच्या कागदपत्रा आधारे ठाकुर अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र तात्काळ विना अट-विना शर्त देण्याचे आदेश उच्च न्यायालय औरंगाबादचे न्यायमूर्ती मंगेश पाटील आणि न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांच्या खंडपीठाने दिला आहे.
याचिका कर्ते नीलकंठ वासुदेव ठाकूर यांच्या कडून अँड सुशांत येरमवार यांनी योग्य युक्तीवाद. केल्याने ठाकूर जमातीला आज जागतिक आदिवासी दिनी न्याय मिळाला आहे.

Back to top button