आपला जिल्हा

२३ आगष्ट ला भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे गडचिरोलीत

गडचिरोली,प्रतिनिधी :-

भारतीय जनता पक्षाच्या वतीने जनसंवाद कार्यक्रम करिता प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे २३ आगष्ट ला गडचिरोली येथे येत आहे ते  स्थानिक जनते सोबत संवाद साधणार आहेत.अशी माहिती गडचिरोली-चिमूर लोकसभेचे खासदार अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

सकाळी १०: ३० वाजता गडचिरोली येथे त्रिमूर्ती चौक ते घीसुलाल काब्रा यांचे घरा पर्यंत प्रदेद्शाध्यक्ष हे पायी चालत परिसरातील मान्यवर नागरिकांशी संवाद साधणार आहेत.त्यानंतर सुमानंद सभागृह येथे गडचिरोली-अहेरी-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील बूथ प्रमुख,शक्ती प्रमुख ते जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्या सोबत संवाद साधणार आहेत.त्यांच्या कामाचा आढावा घेतील.

खासदार अशोक नेते यांच्या लोकसभा -२०२४ क्ग्त्या निवडणूक वांर रूम आणि शिवकृपा मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या नव्या ब्रांच चे उद्घाटन करणार आहेत.

या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार नेते यांनी केले.पत्रकार परिषदेला भाजपचे जेष्ठ नेते बाबुराव कोहळे,लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे,शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,माजी नगरसेवक केशव निम्बोड आदी उपस्थित होते.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker