महाराष्ट्र
राज्यातील मराठी शाळांचा दर्जा खालावत चालला आहे. शाळांचा दर्जा उंचाविण्यासाठी शिक्षकांना अधिक वेळ द्यावा लागणार आहे. असे असताना त्यांना अशैक्षणिक कामे देऊन मराठी शाळा डबघाईस आणण्याचा हा प्रकार आहे. या प्रकारावर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ तीव्र खंत व्यक्त करीत असून या सर्व्हेक्षणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत असल्याचे पत्र आयुक्त (शिक्षण), शिक्षण संचालक (योजना) यांना सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी पाठविले.
वाचकांचा कौल