आपला जिल्हा

नगाजी महाराज मंदिराच्या वालकंपाऊंड प्रशासनाने पाडले

गडचिरोली,प्रतिनिधी :-

शहरातील नागजी महाराज यांचे  देवस्थान चे सरंक्षण भिंतीचे बांधकाम नगर परिषदेने पाडल्याने  नाभिक समाजाच्या भावना दुखावल्याने या बाबत शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

गडचिरोली नगर परिषद क्षेत्रांतर्गत सर्व्हे क्र. ७२/२ मध्ये प्लॉट क्र. १ सौ. शालुलाई खुशरंग शेंडे रा. कन्नमवारनगर, गडचिरोली यांचा मालकीचा आहे.त्यांनी हा प्लॉट नगाजी महाराज मंदिराकरीता दान केला आहे. त्यामुळे तेथे सार्वजनीक नगाजी महाराज मंदिर बांधले आहे. नगाजी महाराज मंदिराच्या पश्चिमेला नगर परिषदचा कोणताही रस्ता नाही. असे असतांना नगर परिषद कार्यालयातील कर्मचारी जेसीबी मशिन घेऊन आले व नगाजी महाराज मंदिराची पश्चिमेकडील वालकंपाऊंड तसेच संडास, बाथरुम तोडून टाकले.

हि कारवाई सुरु असतांना सौ. शालुलाई खुशरंग शेंडे यांच्या पतीला माहीत होताच मोक्यावर धाव घेतली व त्यांना सदरचे बांधकाम पाडण्यास अटकाव केला असता नगर परिषद कर्मचारी आपले जेसीबी मशिन घेऊन पळून गेले.

तेंव्हाच अर्जदाराचे पतीने इतर भावीक लोकांसह नगर परिषद कार्यालय गडचिरोली येथे जाऊन मुख्याधिकारी चंद्रकांत पिदुरकर यांची भेट घेतली असता व कारवाईबद्दल विचारणा केली असता त्यांनी कागदपत्रे सादर कर. सदरची जागा अतिक्रमणमध्ये असल्यामुळे तुम्हाला नोटीस दिला होता, तुम्ही कागदपत्रांची पुर्तता न केल्यामुळे कारवाई करावी लागली असे सांगीतले.

यावेळी नगाजी महाराज मंदिराच्या मागे भाजपा कार्यालयासाठी जमिन खरेदी केल्याचे सौ. शालुलाई खुशरंग शेंडे यांच्यासह शिष्टमंडळ ला लक्षात आले. भाजपा पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दबावात येऊन नगाजी महाराज मंदिराची वालकंपाऊंड तोडून बेकायदेशीरपणे रस्ता काढण्याचा प्रयत्न नगर प्रशासना च्या माध्यमाने केला गेला आहे.

सदर प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकारी यानीत त्यांच्या स्तरावरुन योग्य ती चौकशी होऊन नगाजी महाराज मंदिराच्या मंदिर परिसरातील कोणत्याही बांधकामावर नगर परिषदने अन्यायकारकपणे कारवाई करु नये असा संबधीतांना आदेश देण्यासाठी निवेदन देण्यात  0आले आहे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.