आपला जिल्हा

कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळात उसळणार भविकांची गर्दी

गडचिरोली,प्रतिनिधी :-

नवसाला पावणारी देवी म्हणुन प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली शहरातील कारगिलची देवीची सोमवारी प्रतिष्ठापणा होणार असुन मंडळात यावर्षी गरबा- दांडीयाचा गजर घुमणार आहे. तसेच देविच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दीही उसळणार आहे.

गडचिरोलीच्या कारगिल चौक येथील दुर्गा देवी ही भाविकांचे नवस पूर्ण करते अशी श्रद्धा आहे.याच परिसरात गंगा मातेचे जागृत देवस्थान आहे.गडचिरोली शहरातील सुप्रसिद्ध कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळाची स्थापना १९९९ ला झाली. कारगिल युद्ध याच वर्षी झाले होते. याच वर्षी दुर्गा उत्सव मंडळाने कारगिल युद्धावर एक मोठा देखावा तयार केला होता.हा देखावा बघण्याकरता शहरात खेड्यापाड्यातून आणि अन्य जिल्ह्यातून मोठ्या संख्येने येत होते. यामुळे या चौकाचे नाव कारगिल चौक गडचिरोली असे ठेवण्यात आले. या मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते यांच्या पुढाकाराने या चौकाचे नामकरण कारगिल चौक गडचिरोली असे केले.

यावर्षी मंडळाने गरबा दांडिया उत्सव आयोजित केला आहे. या वर्षी नागपूर येथील वलोकार ज्वेलर्स यांच्या कडून एक ग्रम सोन्याचे पाच पदरी कमळ हार नागपूर च्या शो रूम मधून मोफत मिळणार आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना रोज एक मोफत कुपन देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत विजयी स्पर्धकांना भेट वस्तू आणि मंडळा कडून रोख बक्षीस मिळणार आहे.२३ ऑक्टोबर ला गरबा दांडिया अंतिम स्पर्धा होणार आहे.

विशेष म्हणजे गडचिरोली शहरात नगरपरिषदेने पहिल्यांदाच ठराव घेऊन या चौकाला अधिकृत मान्यता प्रदान केली. कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळातर्पेâ दरवर्षी मोठ्या उत्साहात येथे नवरात्र उत्सव साजरा होतो. मंडळातर्पेâ दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात येते. दरवर्षी हे मंडळ अनेक सामाजिक उपक्रम राबवते. २६ जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. दरवर्षी येथे धार्मिक व देशभक्तीपर प्रबोधनात्मक देखावे तयार करण्यात येतात. सदर देखावे बघण्यासाठी नागरिकांची मोठी रिघ लागलेली असते. महिलासाठी ओटी सजावट स्पर्धा ही नित्यानेमाने आयोजित होत असते.

दुर्गा उत्सव निमित्याने अनेक भाविक इथे दर्शनाला येतात. येथे देवीला नवस बोलल्या जातो आणि हा पूर्ण होतो असा अनेक भाविकांचा समज आहे.या मंडळाचे वैशिष्ट्य हे की दरवर्षी, इथे कुणी ना कोणी भाविक दुर्गा मातेची मूर्ती भेट देत असतो. विशेष हे कि देवीची मूर्ती आणि साज शृंगार स्वरूपात देतात.

कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते हे मागील २१ वर्षापासून या चौकामध्ये कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ इथे एक अमर जवान, च्या धर्तीवर स्मारक व्हावे यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते. त्यांच्या या प्रयत्नाला यश प्राप्त झाले. इथे भव्य दिव्य कारगिल स्मारक तयार झाले आहे. हे स्मारक गडचिरोली शहरातील आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहे.

चंद्रयान- ३ चा देखावा
कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ दरवर्षी धार्मिक,सामाजिक,देशभक्ती आणि ताज्या घडामोडीवर देखावे सादर करीत असतात. या वर्षी चंद्रयान- ३ चा देखावा तयार करण्यात येत आहे. मंडळाचे सचिव प्रकाश भांडेकर यांच्या मार्गदर्शनात उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन,दिलीप मानुसमारे,श्रावण कापगते,प्रकाश रोहणकर हे स्वतः चंद्रयान- ३ चा देखावा गडचिरोलीत तयार करीत आहेत.

मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते यांच्या कुशल नेतृत्वाखाली सचिव प्रकाश भांडेकर, उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन, कोषाध्यक्ष प्रकाश धकाते, प्रवीण कुंभारे,सुनील बावणे,मार्गदर्शक म्हणून कन्हैेयासिंह बैस, नरेंद्र चन्नावार, सुनील देशमुख, डॉ. नरेश बिडकर, मोबीन सय्यद, किशोर सोनटक्के, मोतीराम हजारे,सुभाष माधमशेट्टीवार, मनीष हांडे,विकी डोंगरे, राजू डोंगरे, रुपेश सलामे,महेंद्र मसराम,विजय लोणारे, रेखाताई हजारे, सुचिता धकाते, नीलिमा देशमुख, मंगला गोधनकर, वनिता भांडेकर, रुपाली शेळकी,प्रेमिला कुंभारे, विद्या कुमरे, वनिता धकाते, घुगुस्कर, काकपुरे, लाकडे, वनिता वाडिघरे, संगीता धकाते,संगीता येनगंधलवार आदी सदस्यगण नवरात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करीत आहेत.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker