कृषी व व्यापार

बांबु लागवडी संदर्भात मलेशियाच्या टीमची वन विभागांच्या अधिकाऱ्यांशी बैठक

गडचिरोली,प्रतिनिधी :-

बांबु लागवडी संदर्भात मलेशियाच्या टीमची वन विभागांच्या अधिकाऱ्यांशी बैठक आमदार डॉ देवराव  होळी यांच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्यात बांबु लागवडी करिता घेऊन त्यावर आधारित मोठी बांबु इंडस्ट्री उभारण्याचा व  जिल्हयातील स्थानिकांना रोजगार देण्याचा मानस टीम सोबत चर्चा केली.

आमदार डॉ देवराव होळी यांच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामसभा यांच्या माध्यमातून  जिल्ह्यात बांबु लागवडी करिता पुढाकार घेऊन त्यावर आधारित मोठी बांबू इंडस्ट्रीज उभारण्याचा व त्यातुन जिल्हयातील स्थानिकांना  मोठया प्रमाणावर रोजगार देण्याच्या हेतूने अभ्यास करण्यासाठी आपण गडचिरोली येथे आले  असल्याची माहिती बांबु लागवडी संदर्भात आलेल्या मलेशियाच्या एशियन बांबू सस्टेनिबिलिटीचे सी. ई. ओ.  रघु वेडी कोंडन, सचिन शेट्टी यांनी मुख्य वनसंरक्षक कार्यालय गडचिरोली  येथे वन विभागांच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत  दिली.

बैठकीला आमदार डॉ देवराव होळी,  उप वन संरक्षक मिलिष शर्मा, एशियन बांबू सस्टेनिबिलिटीचे सी. ई. ओ.  रघु वेडी कोंडन, सचिन शेट्टी, तेंदू उपवसंरक्षक  प्रामुख्यानं उपस्थित होते.

बैठकीमध्ये या भागात  बांबूची लागवड कशाप्रकारे केली जाते, किती प्रमाणात केली जाते. कोणत्या प्रकारचे बांबू आहेत. यातून किती  इंडस्ट्री उभारल्या आहेत का?  त्यातुन रोजगाराच्या संधी किती? , बांबू संदर्भात जिल्ह्यातील ग्रामसभांची भूमिका ,वनविभागाची भूमिका,अशा विविध विषयांवर विस्तृत चर्चा झाली.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.