क्राईम

करमटोला गावातील भांडण विकोपाला

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोली मुख्यालयापासून २५ किलोमीटर दूर असलेल्या करमटोला गावातील भांडण विकोपाला गेल्याने बेदम मारहाण झाल्याची घटना घडली असून  पोलिसांनी गुन्हेगारावर गुन्हा दाखल करून चौकशी करावी अशी मागणी पिडीताचा मुलगा गुलाब शिवदास वलादे याने आज पत्रकार परिषदेत केली आहे.

 मोरेश्वर बारीकराव वलादे वय ३० (ग्यरापत्ती आश्रम शाळा कंत्राटी शिक्षक) व त्यांची पत्नी यांचा झगडा सुरू असताना मोरेश्वर बारीकराव वलादे यांनी माझे वडील शिवदास टिकाराम वलादे राहणार करमटोला यांना बेदम मारहाण करून जखमी केले असा आरोप करण्यात आला आहे.

माझ्या वडिलाला जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले असून डोक्यावर जबर जखम होऊन तीन टाके पडलेले आहेत व शरीरावर दुर्मिळ जखमा आहेत तरी माझ्या वडिलाला मारहाण करणाऱ्या मोरेश्वर बारीकराव वलादे याला तात्काळ अटक करून मला न्याय देण्यात यावा अशी मागणी पिडीताचा मुलगा गुलाब शिवदास वलादे  यांनी केलेली आहे.

सदर तक्रार पोलीस स्टेशनला घेतलेली असून तपास सुरू आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker