क्राईमदेश विदेश

नक्षलवाद्यांच्या दोन वरिष्ठ नेत्यांना अटक, गडचिरोलीतही होते सक्रिय ?

गडचिरोली,प्रतिनिधी :-

  नक्षलवाद्यांच्या दोन वरिष्ठ नेत्यांना अटककरण्यात आली असून सदर हे नेते  गडचिरोलीतही सक्रिय होते अशी माहिती पुढे येत आहे. या नेत्यांना  तेलंगणा पोलिसांची अटक केली असून पुढील तपासाची कारवाई ते करीत आहेत.

सदर हे दोन्ही वरिष्ठ नेते नक्षलवाद्यांसाठी हत्यार निर्मिती करणाऱ्या तांत्रिक समितीचा सदस्य आहेत. या  वरिष्ठ नक्षलवादी नेत्याला पत्नीसह अटक करण्यात तेलंगणा पोलिसांना यश आले आहे. 

त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड, बँक खात्याची कागदपत्रे, एक एटीएम कार्ड, दोन मोबाईल फोन, १.५८ लाख रोख आणि नक्षलवाद्यांच्या बैठकींशी संबंधित महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. ‘पीएलजीए’ सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी दोघांना अटक झाल्याने नक्षलवादी चळवळीला धक्का बसल्याचे बोलल्या जात आहे.

डोंगा गंगाधर राव (८०) उर्फ नरसन्ना उर्फ बकन्ना उर्फ वेंगो दादा आणि त्यांची पत्नी भवानी (६०) उर्फ सुजाता उर्फ श्यामला उर्फ लक्ष्मी अशी दोघांची नावे असून गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या मंचेरियाल जिल्ह्यातील इंदाराम गावातून त्यांना ताब्यात घेण्यात आले. रामगुंडम पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून तेलंगणातील कोनसीमा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या गागांधरराव १९८० मध्ये नक्षलवादी चळवळीत सामील झाला होता. यादरम्यान त्याची भवानी हिच्याशी ओळख झाली. दोघेही चळवळीत सक्रिय होते. गंगाधरराव हा नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य झोनमध्ये विशेष क्षेत्रीय समितीच्या तांत्रिक शाखेचा सदस्य होता. तर पत्नी भवानीकडे निधी संकलन, पोषाखांची व्यवस्था करणे आदी जबाबदारी होती. केंद्रीय समितीचा सदस्य चंद्रण्णा याच्या सूचनेवरून कार्यरत हे दोघेही तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा आणि झारखंडमधील माओवादी कारवायांमध्ये सहभागी होते. काही दिवसांपूर्वी इंदाराम येथे बनावट आधार कार्डच्या माध्यमातून राहायला आले. येथे त्यांनी छोटेसे घरदेखील बांधले होते.

२ डिसेंबरपासून नक्षलवाद्यांचा ‘पीएलजीए’ सप्ताह सुरू झाला असून दोघेही यादरम्यान घातपात घडविण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. परंतु आधीच त्यांना अटक करण्यात आल्याने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.गडचिरोलीतील सिरोंचा परिसरात होणाऱ्या नक्षलवाद्यांच्या बैठकांना ते उपस्थित राहायचे. त्यांना सहकार्य करणारा श्रीनिवास फरार असून त्याला पकडण्यासाठी तेलंगणा पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. त्यांच्यावर गडचिरोली येथे कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे पोलीस विभागाचे म्हणणे आहे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.