आपला जिल्हा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ वितरण सोहळा

गडचिरोली,प्रतिनिधी :-

महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्य आरोग्य व पोषणामध्ये आणि कुटूंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ वितरण सोहळा १७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

        या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार डॉ. नामदेवराव किरसान, आमदार अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, आमदार डॉ. देवराव होळी, आ. कृष्णाजी गजबे, जिल्हाधिकारी संजय दैने, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार उपस्थित राहणार असल्याचे जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अर्चना इंगोले व बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती कडू यांनी कळविले आहे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.