राजुरा, प्रतिनिधी :-
अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळ, श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम यांच्या केंद्रीय प्रचार विभागाच्या निर्वाचन प्रक्रियेतून राजुरा तालुका सचिवपदी मानोली बुज. येथील मनोहर पासपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नुकत्याच तेलंगणा राज्यात झालेल्या २० व्या आंतरराज्यीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलन, गोयेगाव येथे त्यांना ‘चैतन्य युवा पुरस्कार’ मिळाला होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
नवीन कार्यकारिणीस सहकार्य करण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला. त्यांच्या नियुक्तीबद्दल प्रचारक ॲड. राजेंद्र जेनेकर, तालुका सेवाधिकारी लटारू मत्ते, उपसेवाधिकारी विनायक सोयाम, नगरसेवाधिकारी बळीराम बोबडे, भजनप्रमुख प्रल्हाद उईके, नगरकोषाध्यक्ष उद्धव झाडे, युवकप्रमुख गजानन बोबडे, संघटक मनोहर बोबडे, सदस्य गजेंद्र ढवस, मारोती लोहे, सचिव सतीश देवाळकर, मंगेश गौरकर आदींसह तालुक्यातील मंडळांनी अभिनंदन केले आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button