गडचिरोली, प्रतिनिधी :-
महाराष्ट्र शासन च्या सामान्य प्रशासन विभागाने गडचिरोली जिल्ह्यासाठी नव्या पालक सचिवांची नियुक्ती केली आहे. शासन आदेशानुसार श्री. मिलिंद म्हैसकर यांच्या ऐवजी आता राजेश अग्रवाल, मुख्य सचिव यांची गडचिरोली जिल्ह्याच्या पालक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशासकीय कारणास्तव हा बदल करण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे. नव्याने नियुक्त झालेले राजेश अग्रवाल हे राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी असून जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा, विविध शासकीय योजनांचे समन्वय आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे राहणार आहेत.
गडचिरोलीसारख्या आदिवासी व दुर्गम जिल्ह्यात विकास कामांना गती देणे, पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि शासकीय यंत्रणेमध्ये समन्वय राखणे ही मोठी जबाबदारी नव्या पालक सचिवांसमोर असणार आहे.
दरम्यान, या नियुक्तीमुळे जिल्हा प्रशासनात नवे नेतृत्व मिळाल्याची चर्चा असून विकास प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अधिकृत शासन निर्णय (GR) आणि सर्व विभागाच्या पुढील अपडेट्ससाठी
महाभारत न्यूज पोर्टल ला आणि चॅनेल ला नियमित भेट द्या.
शासन निर्णय वाचा :-
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button