आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय

खासदार डॉ. नामदेव किरसान उपचारासाठी नागपूरात दाखल; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

उदय धकाते

गडचिरोली :-

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना नागपूर येथील विवेका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती समोर आल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते, समर्थक तसेच राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागपूर येथील विवेका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी आज रुग्णालयात जाऊन खासदार किरसान यांच्या प्रकृतीची आस्थेपूर्वक चौकशी केली. तसेच त्यांनी डॉ. किरसान लवकरात लवकर पूर्णपणे बरे होऊन पुन्हा पूर्वीप्रमाणे जनसेवेत सक्रिय व्हावेत, अशी सदिच्छाही व्यक्त केली.

दरम्यान, २६ मे रोजी गडचिरोली येथे आयोजित काँग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांच्या पदग्रहण सोहळा व शेतकरी मेळाव्यास खासदार डॉ. किरसान उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सुरू असून, कार्यक्रमात त्यांच्या प्रकृतीसाठी विशेष प्रार्थनाही केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मागील जवळपास एका वर्षापासून खासदार डॉ. किरसान यांच्या प्रकृतीबाबत विविध तर्क-वितर्क राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यांच्या आरोग्याविषयी सातत्याने चर्चा होत असून विरोधकांकडूनही आगामी राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवले जात असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याने त्यांच्या प्रकृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डॉ. नामदेव किरसान यांनी आदिवासी, शेतकरी आणि ग्रामीण भागातील प्रश्न संसदेत सातत्याने मांडले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत समर्थकांमध्ये चिंता व्यक्त होत असून ते लवकर बरे व्हावेत, यासाठी जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker