आपला जिल्हाराजकीय

विश्वजित कोवासे यांची गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती

गडचिरोली, प्रतिनिधी :-

भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव विश्वजित मारोतराव कोवासे यांची गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होती. विद्यमान जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या कार्यकाळात काँग्रेस पक्षाचा एक आमदार विधानसभेत निवडून आला होता. दरम्यान, गडचिरोली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून विश्वजित कोवासे हे इच्छुक होते. मात्र पक्षाने उमेदवारी न दिल्यानंतरही त्यांनी पक्षनिष्ठा जपत उमेदवारी मागे घेत काँग्रेस पक्षाचे काम सुरू ठेवले.

माजी मंत्री तथा माजी खासदार मारोतराव कोवासे यांचे पुत्र असलेल्या विश्वजित कोवासे यांना त्यांच्या वडिलांचा राजकीय वारसा लाभला आहे. मारोतराव कोवासे यांना काँग्रेसमधील निष्ठावान नेते म्हणून मानणारा मोठा वर्ग आजही जिल्ह्यात आहे. गडचिरोली विधानसभेत त्यांनी तीन वेळा प्रतिनिधित्व केले होते.

विश्वजित कोवासे यांच्या नियुक्तीनंतर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सध्या ते गुजरात येथे पक्ष संघटन मजबूत करण्याचे काम करीत असून विविध राज्यांतील निवडणुकांमध्ये त्यांनी केलेल्या कार्याची दखल राष्ट्रीय काँग्रेस नेतृत्वाने घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे गडचिरोली जिल्हा काँग्रेसची धुरा सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker