आपला जिल्हाताज्या घडामोडी

जंगली हत्तीच्या हल्ल्यात नुकसानग्रस्त शेतीची काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांनी केली पाहणी

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विश्वजित मारोतराव कोवासे यांनी पदग्रहण होताच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्परता दाखवत आज सकाळी जंगली हत्तीच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्या या तातडीच्या दौऱ्यामुळे शेतकरी वर्गात तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, गरिबांच्या मदतीला धावून जाणारा तरुण नेता अशी त्यांची प्रतिमा अधिक मजबूत होत आहे.

जंगली हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शासनाकडून शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही ॲड. कोवासे यांनी दिली.

यावेळी त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पाचभाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत देण्याची मागणी केली. तसेच वन विभागाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.

या पाहणी दौऱ्यात नगरसेवक रमेश चौधरी, माजी नगरसेवक बंडू शनिवारे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, नंदूभाऊ वाईलकर, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, ज्येष्ठ नेते जितू मुनघाटे, स्थानिक शेतकरी आशिष सालोटकर, जितेंद्र मुप्पीडवार, दीपक चौधरी तसेच मजूर वर्ग आणि गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker