आपला जिल्हा

गडचिरोली T 20 स्टेडियम सज्ज 

उदय धकाते

गडचिरोली :-

लॉर्डइस मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) तर्फे आयोजित गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग (GDPL) T 20 स्पर्धेकरिता उभारण्यातआलेल्या नवीन भव्य स्टेडियम हे सज्ज झाले असून.बैठक व्यवस्था असलेले स्टेडियम उभारले जात असून हे कामावर आता अंतिम हात फिरवला जात आहे. 

१० हजार क्रिकेट प्रेमी रोज उपस्थित राहतील.असा आयोजकांनी सांगितले.सामने बघण्यासाठी निशुल्क प्रवेश राहणार आहे.

उद्‌घाटन सोहळा रोजी येथे गडचिरोली येथे भारताचे माजी कर्णधार कसोटीपटू रवी शास्त्री यांच्या हस्ते येथे मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. 

बी. प्रभाकरन, व्यवस्थापकीय संचालक, लॉईड्स मेटल्स यांच्या उपस्थितीत होणार आहे.

उद्‌घाटन सोहळा दुपारी ३:३० वाजता सुरु होईल. जिथे रवि शास्त्री यांना मुख्य अतिथी म्हणून सन्मानित करण्यात येईल. त्यानंतर स्पर्धेतील सर्व संघांचा भव्य मार्च पास्ट होणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर केला जाणार आहे, जो संपूर्ण सोहळ्याचा मुख्य आकर्षण असेल,पहिला साखळी सामना संध्याकाळी ५:०० वाजता सुरु होईल, जिथे लॉईड्स संघ खेळणार आहे. दुसरा सामना रात्रौ ८.३० वाजता होईल. ६ फेब्रुवारीपासून पुढील सर्व सॉमने या वेळा पत्रकानुसार होणार आहेत

पहिला सामनाः दुपारी ४:०० संध्याकाळी ५.००

दुसरा सामना संध्याकाळी ५:३० रात्री १०:

 

या स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुक्यांचे संघतसेच पोलीस, वन आणि महसूल विभाग व लॉईड्स मेटल्स यांचे संघ सहभागी होणार आहेत. स्थानिक खेळाडूंना त्याच्या प्रतिमेचे प्रदर्शन करण्यासाठी ही एक उत्तम संधी मिळणार आहे

इतक्या भव्य प्रमाणात आणि क्रिकेट क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत होणारी ही स्पर्धा गडचिरोलीकरासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker