आपला जिल्हा

७ दिवसापासून नगर परिषद चे कर्मचारी संपावर

गडचिरोली, प्रतिनिधी :-
राज्य संवर्गातील अधिकारी / न.प. कर्मचारी / सफाई कर्मचारी यांच्या मागण्यांकरिता बेमुदत संप सुरु असून गडचिरोली नगर परिषद चे अधिकारी आणि कर्मचारी हे मागील ७ दिवसापासून बेमुदत संपावर आहेत. या मुळे नागरिकांची काम होत नसल्याने राज्य सरकार विरोधात नाराजी व्यक्त करीत आहे.

महाराष्ट्र शासन अंतर्गत नगरपरिषद, नगरपंचायती मधील राज्य संवर्ग ३,००० अधिकारी व स्थानिक ६०,००० वर कर्मचारी यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी झालेली नाही. तसेच, जुनी पेंशन योजना बंद झाल्याने दि. २९/०८/२०२४ पासून बेमुदत संप संप पुकारला असून आज ७ वा दिवस आहे.

नगरपरिषद/नगरपंचायतीमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या समस्या व मागण्या

संयुक्त मागण्या :-
१. जुनी पेंशन/NPS/UPS लागू करून तात्काळ अंमलबजावणी करणे.
२. न.प. कर्मचारी यांना १०:२०:३० आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी.

राज्य संवर्ग अधिकारी यांच्या मागण्या:-

१. नमा राज्य संवर्ग अधिकारी हे शासकीय कर्मचारी असल्याने त्यांना तात्काळ सेवार्थ आयडी देण्यात यावा.

२. मुख्याधिकारी पदावर पदोन्नती प्रमाण २०% वरून ६०% करण्यात यावा.

३. सर्वर्ग अधिकारी श्रेणी-अ पदास गट-ब (राजपत्रित) दर्जा व श्रेणी व पदास गट-व (अराजपत्रित) दर्जा करण्यात यावा.

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटना

३. आगाऊ वेतन अनुदान एक महिना अगोदर देणे.

४. सेवानिवृत्ती वेतन अंशदान व रजा वेतन अंशदान यांचा समावेश सहायक अनुदान मध्ये करण्यात यावा. या व इतर मागण्या मान्य कराव्यात

न.प. कर्मचारी यांच्या मागण्या:-

१. नगरपरिषद कर्मचारी यांना शालार्थ/नगरार्थ आयडी देण्यात यावा.
२. राज्य संवर्ग श्रेणी-क पदांवर २५% जागा स्वतंत्र परिक्षा घेऊन किंवा सेवा ज्येष्ठतेने भरण्यात याव्यात.
३. ग्रामपंचायत कालीन कर्मचारी यांची सेवा ग्राहा घरण्यात येऊन त्यांना जुनी पेंशन लागू करणे.
४. नक्षलग्रस्त किंवा अवघड क्षेत्रामध्ये कार्यरत नगर
परिषद आस्थापना कर्मचारी यांना शासन निर्णयानुसार एकस्तर वेतनश्रेणी लागू करणे.

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद्, नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटना

सफाई कर्मचारी यांच्या मागण्या:-
१. सफाई कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष तयार करणे.
२. डॉ. बाबसाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना लागू करण्यात यावा.
३. व्यपगत सफाई कर्मचारी पद पुनर्जीवीत करुन पदांची भरती करण्यात यावी.

या विविध मागणी करिता नगर परिषद गडचिरोली चे सर्व अधिकारी व कर्मचारी हे बेमुदत संपात सहभागी झाले आहे.

https://x.com/uday_dhakate/status/1831364600631304226?t=htIsr6IgBGs8xnMQcRMpSg&s=19

 

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.