आपला जिल्हाक्राईम

बलात्काराच्या गुन्हयातील 14 वर्षापासुन फरार  आरोपी जेरबंद

पोलीस कोठडी सुनावली

गडचिरोली, प्रतिनिधी :-

बलात्काराच्या गुन्हयातील 14 वर्षापासुन न्यायालय परिसरातून फरार असलेल्या आरोपीला गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे.

मुलचेरा तालुक्यातील मौजा देशबंधूग्राम येथे राहणारा अनादी अमुल्य सरकार वय 40 वर्ष याला सन 2012 मध्ये सी.सी.क्र. 42/2012 मधील कलम 376,506, भादवी. तसेच सी.सी.क्र. 63/2012 मधील कलम 224 भादवीच्या गुन्हयामध्ये मुलचेरा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्याला मा. न्यायालयासमोर हजर करण्यात आले. मा. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला न्यायालयाबाहेर आणुन बेडया लावत असतांना आरोपी अनादी सरकार हा पोलीसांना चकमा देवून फरार झाला. पोलीसांनी त्याचा पाठलाग केला होता.

सन 2012 पासुन पोलीसांच्या तावडीतुन फरार झालेला आरोपी अनादी सरकार शोध घेवुनही तो मिळून येत नव्हता, दि. 03/11/2024 रोजी अशी गोपनिय माहिती मिळाली की, सदर आरोपी हा देशबंधुग्राम येथील आपल्या राहते घरी आला आहे, या विश्वसनिय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्रेणिक लोढा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन मुलचेरा येथील प्रभारी अधिकारी पो.नि. महेश विधाते यांचे नेतृत्वात पोउपनि संदिप साखरे, पोलीस हवालदार,चरनदास कुकडकार, विष्णू चव्हान, संतोष दहेलकर,बाळू केकान,सचिन मंथनवार, जयश्री आव्हाड, शोभा गोदारी यांनी काल दि. 04/11/2024 रोजी मौजा देशबंधूग्राम येथील अरोपीच्या घरी सापळा रचुन आरोपीला अटक करण्यात आलीे.

अटक केल्यानंतर आरोपीला मा. न्यायालय चामोर्शी येथे हजर केले असता, मा. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker