आपला जिल्हानिवडणूक

अखेर भाजपा आमदार डॉ देवराव होळी यांनी गडचिरोली सोडली…! 

पक्षाचा आदेशानुसार अन्य जिल्ह्यात मुक्काम

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली विधासभा निर्वांचन क्षेत्रातून दोनदा आमदार झालेले डॉ. देवराव होळी यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल करीत भाजप मध्ये खळबळ उडवून दिली. भाजप कडून दबाव येताच त्यांनी अखेरच्या क्षणी त्यांनी उमेदवारी मागे घेतली. आज त्यांनी गडचिरोली विधानसभा निर्वाचन क्षेत्र सोडल्याने भाजपातील पदाधिकारीनी सुटकेचा श्वास घेतला आहे.निवडणुकीच्या काळात ते अन्य जिल्ह्यात मुक्कामी राहणार आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या आदेशाने भारतीय जनता पार्टी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे उमेदवार संजय पुराम यांच्या प्रचारार्थ गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी देवरी विधानसभे करिता रवाना झाले.

आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रात आमदार डॉ. देवराव होळी यांचे जुने सहकारी व मित्र संजय भाऊ पुराम हे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार असून त्यांच्या विजयासाठी आमदार डॉ.देवराव होळी पुढील काही दिवस देवरी विधानसभा क्षेत्रात मुक्कामी राहून त्यांच्या विजयासाठी प्रचार करणार आहेत.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker