आपला जिल्हानिवडणूक

गडचिरोलीत भाजपाची एकाकी लढत 

उदय धकाते 

गडचिरोली

विधानसभा निवडणूक २०२४ चे गडचिरोली जिल्ह्यातील महायुती मध्ये खिंडार पडल्याने भाजप एकाकी लढत देत असतांना त्यांची दमछाक होत आहे.महायुतीचे मित्र पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना हे प्रचार यंत्रणापासून कोसो दूर असल्याने भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत.

गडचिरोली, आरमोरी आणि अहेरी विधानसभा क्षेत्रात महायुतीचे तीन उमेदवार हे आहेत आरमोरी आणि गडचिरोली मध्ये भाजपचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आरमोरी ला जुनाच चेहरा दिल्याने काँग्रेस मध्ये चैतन्याचे वारे असून इथे काँग्रेस पक्षाने नवखा उमेदवार दिला आहे. परंतु येथे अजित पवार च्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदेची शिवसेना प्रचार यंत्रणा पासून दूर असल्याने सर्व मदार आता पोरेड्डीवार परिवार आहे.

गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भाजपचे विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांना पक्षाने तिकीट नाकारून येथे नवखा उमेदवार दिल्याने डॉ. होळी व त्यांचे कट्टर समर्थक हे नाराज आहेत. भाजपने डॉ. मिलिंद नरोटे यांना उमेदवार करून डॉ. होळी यांना धक्का दिला. डॉ. होळी हे अपक्ष उमेदवार राहणार होते परंतु त्यांच्यावर पक्षाने दबाव आणून उमेदवारी मागे घेण्यासाठी भाग पाडले असले तरी त्यांचे समर्थक हे अद्याप ही नाराज असून भाजपचे उमेदवार डॉ. नरोटे यांच्या प्रचार यंत्रणा पासून अंतर राखून आहे.या मुळे भाजपात अस्वस्थ झाली आहे.

महायुतीमधील राष्ट्रवादी आणि शिवसेना मित्र पक्षाचे जिल्हा पदाधिकारी हे भाजपा पासून दूर गेल्याचे चित्र पाहावायस मिळत आहे. अहेरी येथे महायुती कडून राष्ट्रवादी काँग्रेस कडे उमेदवार धर्मराव बाबा आत्राम असून यांच्या परिवाराकडून कन्या भाग्यश्री आत्राम आणि पुतणे राजे अंबरीशराव महाराज आत्राम हे भाजप बंडखोर उमेदवार म्ह्णून रिंगणात उतरल्याने येथे लढत चुरशीची होणार आहे.भाजपचे कार्यकर्ते हे राजे अंबरीशराव महाराज यांच्या कडून प्रचार करीत आहेत. भाजपने अद्याप यांच्यावर कारवाई न केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आरमोरी आणि गडचिरोली मध्ये भाजपा उमेदवार च्या प्रचार कार्यापासून दूर आहे. तसेच या दोन्ही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाला योग्य सन्मान आणि प्रचार यंत्रणा करिता सहकार्य नसल्याने ते प्रचार पासून अलिप्त आहे.

गडचिरोलीचे भाजप उमेदवार डॉ. नरोटे यांना भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा फटका सद्या बसत आहे.डॉ. नरोटे यांनी प्रसिद्धी माध्यमाना दूर ठेवले आहे.याचा फायदा काँग्रेस पक्ष कसा घेतो हे पाहणे आवश्यक आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker