आपला जिल्हानिवडणूक

चामोर्शी व गडचिरोली शहरात भाजपचे शक्तीप्रदर्शन

गडचिरोली, प्रतिनिधी :-

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम दिवशी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ.मिलिंद नरोटे यांनी सुप्रसिध्द मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरच्या रोड-शोच्या माध्यमातून आपले शक्तिप्रदर्शन दाखविले. ही रॅली चामोर्शी व गडचिरोली शहरातून काढण्यात आली.

 यावेळी माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, भाजपा महामंत्री प्रकाश गेडाम, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. गिताताई हिंगे, नगरसेविका रोशणीताई वरगंटे, भाजपा तालुका अध्यक्ष आनंद भांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ.मिलिंद नरोटे यांच्या प्रचारार्थ सुप्रसिध्दी मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर यांचा भव्य रोड-शो ची सुरुवात सर्वप्रथम चामोर्शी शहरातील भाजप प्रचार कार्यालयापासून लक्ष्मी गेट व वरवंटी चौक अशी करण्यात आली.

त्यानंतर गडचिरोली शहरातील भाजपा प्रचार कार्यालयातून सई ताम्हणकर यांच्या भव्य रोड-शो ला सुरुवात करुन शहरातील बेसिक शाळा, राम मंदिर, धानोरा रोड, भाजपा प्रचार कार्यालय व गडचिरोली शहरातून रॅली काढण्यात आली.

गडचिरोली शहरातील भाजपा रॅली

 यावेळी मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. भव्य रोड-शो च्या माध्यमातून सुप्रसिध्द अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ.मिलिंद रामजी नरोटे यांचा प्रचार केला.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker