आपला जिल्हा

गडचिरोलीला उद्या तिरंगा बाईक रॅलीत-आमदार डॉ. देवराव होळी

गडचिरोली, प्रतिनिधी :-

१५ ऑगस्टला सकाळी १०:३० वाजता आमदार डॉ. देवराव होळी यांचे जनसंपर्क कार्यालयापासून रॅलीचा शुभारंभ होणार आहे.

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा अभियानांतर्गत संपूर्ण देशभरामध्ये तिरंगा महोत्सव सुरू असून त्याच प्रेरणेने गडचिरोली शहरात तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

रॅलीचा मार्ग असा राहील…

रॅली एकत्रीकरण व शुभारंभ आमदार डॉ. देवराव होळी यांचे जनसंपर्क कार्यालय गडचिरोली – इंदिरा गांधी चौक यू टर्न – धानोरा रोड – शिवाजी महाविद्यालय – संघ कार्यालय – रेड्डी गोडाऊन – चामोर्शी रोड – सायन्स कॉलेज गोकुळनगर बायपास रोड – आयटीआय चौक – कारगिल चौक – इंदिरा गांधी चौक त्यानंतर आमदार जनसंपर्क कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे.

हि तिरंगा रॅली आमदार डॉ. देवराव होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयातून सकाळी १०:३० वाजता सुरू करण्यात येणार आहे. या रॅलीला तिरंगा प्रेमी बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker