प्रमाण भाषा व बोली यांचे अतुट नाते आहे किंबहुना बोलीतुनच प्रमाण भाषेची निर्मीती झाली आहे.म्हणून प्रमाणभाषेला समृध्द करण्यासाठी व तिला बळ देण्यासाठी बोली टिकणे गरजेचे आहे. यासाठी सर्व स्तरातील व्यक्तीनी नामशेष होत असलेल्या बोलींचे जतन करण्यासाठी प्रयत्न करावे. असे प्रतिपादन जिल्हा परिषद हायस्कूल गडचिरोली ग्रंथोत्सव समारोहातील कवीसंमेलनात डॉ. चंद्रकांत लेनगुरे यांनी अध्यक्षीय भाषणातून केले.
ग्रंथमहोत्सवातील सहाव्या टप्प्यातील कवीसंमेलनाच्या प्रसंगी व्यासपीठावर पाहुणे म्हणून नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह भाऊराव पत्रे,ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, उपशिक्षणाधिकारी अमरसिंग गेडाम, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील भाऊ गजभारे,शिवाजी महाराज ग्रंथालयचे अध्यक्ष जगदीश म्हस्के, झाडी बोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा. विनायक धानोरकर, ज्येष्ठ कवी डॉ. प्रविण किलनाके उपस्थित होते.
या कविसंमेलनात गजानन गेडाम, अविनाश निकोडे,उपेंद्र रोहणकर,किशोर मलेवार, किरण चौधरी, प्रतिक्षा कोडाप,यामिनी मडावी,हितेश राठोड, प्रवीण किलनाके,प्रिती चहांदे,गणेश राजुरकर,वंदना मडावी,खेमदेव हस्ते,रंजना चुधरी,रोशनी दाते,वंदना सोरते, चेतन ठाकरे ,उकंडराव राऊत, कुलदीप सांत्वन , आनंदराव बावणे,प्रेमदेव म्हस्के ,यांनी आपल्या बहारदार रचना सादर केल्या तर आपल्या गोड आवाजात प्रेमिला अलोने यांनी गुरूपौर्णिमा,संजीव बोरकर यांनी,’झुंझरुका’ गझल, पुरूषोत्तम ठाकरे यांनी गझल,रमेश डोंगरे ‘यांनी नको त्याच वेळी’ ही गझल, विनायक धानोरकर यांनी ‘झाडीपट्टी’ ही कविता गाऊन सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.तसेच प्रा. रामचंद्र वासेकर यांची ‘विस्कटलेले वर्तमान’, डॉ. ‘चंद्रकांत लेनगुरे यांची ‘आंगधुना’ या कविता रसिकांना वैचारिक खाद्य देणाऱ्या ठरल्या. विविध विषयांवर कविता सादर करून कवींनी प्रेक्षकांची मने जिंकली.या संमेलनात एकूण ३० कवींनी सहभाग घेतला.
या कविसंमेलनाचे सुंदर संचालन यामिनी मडावी केले. आभार चेतन ठाकरे यांनी केले. या कार्यक्रमास शालेय विद्यार्थी, शिक्षकवृंद, अधिकारी, बहुसंख्येने उपस्थित होते.