आपला जिल्हा

गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी नारायण धकाते यांची नियुक्ती

अखिल भारतीय रोजगार हमी कामगार वेलफेअर संघटनेत नवी जबाबदारी

आरमोरी (जि. गडचिरोली, प्रतिनिधी ):-

अखिल भारतीय रोजगार हमी कामगार वेलफेअर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण गजभिये यांनी गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी नारायण धकाते यांची नियुक्ती केली आहे.

या नियुक्तीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील रोजगार हमी कामगारांच्या हक्कांसाठी आणि कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी संघटनेचे कामकाज अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

नवीन जिल्हा अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर नारायण धकाते यांनी संघटनेच्या सर्व सदस्यांचे आभार मानून, रोजगार हमी कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या नियुक्तीबद्दल हरीष मने, राकेश बेलसरे, राकेश बैस, संजय कुथे, मंगलसिंग मेश्राम, दिपक बारसागडे, नितिन मानापूरे, ज्ञानेश्वर कवासे, खानदेशकर, रघुनंदन जाळी, राजेंद्र दिवटे, अश्विन तितिरमारे, कमलेश धकाते, नरेश वझाडे, संजय मानकर, संजय बोरुले, नंदकिशोर मने आणि अविनाश वरगंटीवार यांनी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker