क्रीडा व मनोरंजन

गडचिरोलीत गझल कार्यशाळेचे आयोजन

गडचिरोली,प्रतिनिधी :-

झाडी बोली साहित्य मंडळ जिल्हा शाखा गडचिरोली तर्फे गझल कार्यशाळा रविवार दिनांक ११ जूनला शिवाजी हायस्कूल,गोकूळनगर गडचिरोली येथे आयोजित केलेली आहे.

आजच्या युगात साहित्यिक व रसिक गझलेच्या प्रेमात पडत आहेत.साहित्य क्षेत्रातील अनेक कवीं गझलेची बाराखडी माहित नसतांना गझलसदृश्य रचनेला गझल म्हणून कंटाळतात आणि टीकेचं पात्र होतात.काहींना गझल म्हणजे काय? हे जाणून घेण्याची उत्सुता असते.पण गझलगुरू दुर्मीळ असल्याने ते शक्य होत नाही.

   या बाबींची दखल घेऊन झाडी बोली साहित्य मंडळ जिल्हा शाखा गडचिरोली तर्फे गझल कार्यशाळा रविवार दिनांक ११ जूनला सकाळी ११.०० वा. शिवाजी महाविद्यालय ,गोकूळनगर आयोजित केलेली आहे. सदर कार्यशाळेला झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध गझलकार दिलीप पाटील, प्रशांत भंडारे हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध गझलकार मिलिंद उमरे हे भुषविणार आहेत.

  या कार्यशाळेत गझलेची बाराखडी (तंत्र,मंत्र)याबाबत सविस्तर माहिती, मिळणार येणार आहे. तरी इच्छुक कवी,जिज्ञासूनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.असे आवाहन झाडीबोली मंडळाचे पदाधिकारी प्रा. विनायक धानोरकर, डॉ. प्रविण किलनाके,जितेंद्र रायपुरे,पुरूषोत्तम ठाकरे,प्रतिक्षा कोडापे ईत्यांदीनी केले आहे.अधिक माहिती साठी ९४२३६४६७४३ या मोबाईल नंबर संपर्क साधावा.

 

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker