ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

७५ शाळांच्या अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र वाटपाला स्थगिती

मुंबई, प्रतिनिधी :-

राज्यात शासकीय दुखवट्याच्या कालावधीत ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा बहाल करणारी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आल्याच्या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेला तात्काळ स्थगिती देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात २८ ते ३० जानेवारीदरम्यान शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. मात्र, याच कालावधीत अल्पसंख्याक विकास विभागाकडून ७५ शाळांना भाषिक व धार्मिक अल्पसंख्याक दर्जा देणारी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आल्याने या प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आला आहे.

दरम्यान, संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे समजते.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker