क्राईमताज्या घडामोडी

बनावट सोन्याचा हार देत भाजीविक्रेत्याला ८ लाखांचा गंडा

जालना, प्रतिनिधी :-

शहरात बनावट सोन्याचा हार देऊन एका भाजीविक्रेत्याला तब्बल आठ लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीकृष्णनगर म्हाडा कॉलनी परिसरात राहणारे संतोष नामदेव उमरे (वय ४९) यांचा दोन अज्ञात व्यक्तींनी विश्वास संपादन केला. ११ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारास आरोपींनी मुलीच्या आजाराचे खोटे कारण सांगत उमरे यांना बनावट सोन्याचा हार देऊन आठ लाख रुपयांना फसवले.

या प्रकरणी उमरे यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गवई करीत आहेत.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker