अपघातताज्या घडामोडी

जीटी एक्सप्रेस च्या शेवटच्या डब्याला आग; सुदैवाने जीवितहानी टळली

वर्धा, प्रतिनिधी :-

नागपूर येथून चेन्नई कडे जाणाऱ्या जीटी एक्सप्रेसच्या शेवटच्या डब्याला आग लागल्याची घटना घडली. सिंदी रेल्वे स्टेशन आणि तुळजापूर दरम्यान ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गाडीच्या शेवटच्या डब्यात पार्सल व्यवस्था होती आणि त्यालाच गार्डचा डबा जोडलेला होता. अचानक आग लागल्याने काही काळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच सिंदी येथील अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, रेल्वे प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker