निवडणूक
ब्रेकिंग न्यूज : भाजपमध्ये मोठा स्फोट! लिना चिचघरे यांचा अर्ज दाखल
एबी फॉर्म गायब, गडचिरोलीत राजकीय तापमान उसळले!

गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत आज जबरदस्त राजकीय नाट्य घडले. भाजपच्या वतीने लिना सतीश चिचघरे यांनी नगराध्यक्ष पदासाठी नामांकन दाखल केले, मात्र त्यांच्याकडे एबी फॉर्म नसल्याचा मोठा स्फोटक खुलासा होताच संपूर्ण भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
भाजपने आत्तापर्यंत कुठल्याही उमेदवाराला एबी फॉर्म दिलेला नाही, त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी पक्षात जबरदस्त रस्सीखेच, गटबाजी आणि सस्पेन्स निर्माण झाला आहे. अर्ज दाखल केला असला तरी अधिकृत उमेदवार कोण? हा मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. इच्छुकांमध्ये प्रचंड धाकधूक आणि तणाव वाढत आहे.
दुसरीकडे, विरोधकांनी मात्र वेळ दवडला नाही —
राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळ) ने सर्वप्रथम आपला उमेदवार जाहीर करत अश्विनी रविंद्र नैताम यांना एबी फॉर्मसह नामांकन दाखल करून भक्कम आघाडी घेतली आहे. गडचिरोलीच्या राजकारणात हा निर्णय “गेम चेंजर” ठरत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, कविता सुरेश पोरेड्डीवार यांनी सुद्धा अपक्ष अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसमध्येही एबी फॉर्म अद्याप न दिल्याने अनिश्चितता कायम आहे.
अपक्ष उमेदवारांनीही मैदानात उतरल्याने, गडचिरोलीची नगराध्यक्ष पदाची लढत आता पूर्वीपेक्षा अधिक तीव्र, तापलेली आणि धडकी भरवणारी बनली आहे!
नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेले उमेदवार :-
1. वनीता रतन बांबोळे – अपक्ष
2. लीना सतीश चिचघरे – भाजपा (एबी फॉर्म अप्राप्त)
3. अश्विनी रविंद्र नैताम – राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ (एबी फॉर्म प्राप्त)
4. कविता सुरेश पोरेड्डीवार – अपक्ष


