आपला जिल्हाआरोग्यताज्या घडामोडीसामाजीक

गडचिरोलीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे निलंबित!

कर्तव्यात कसूर व दुर्लक्ष केल्याचा ठपका; महाराष्ट्र शासनाचा १६ सप्टेंबरचा आदेश, विभागीय चौकशीचेही निर्देश

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोलीच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा शिवाजी लहाडे यांच्यावर महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने निलंबनाची कारवाई केल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

शासनाच्या १६ सप्टेंबर २०२६ रोजीच्या गोपनीय आदेशानुसार, डॉ. लहाडे यांनी त्यांच्या पर्यवेक्षकीय जबाबदारीत अक्षम्य निष्काळजीपणा व दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची विभागीय चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

आदेशानुसार, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ४ च्या तरतुदीनुसार डॉ. लहाडे यांना आदेशाच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले असून, पुढील आदेश होईपर्यंत निलंबन कायम राहणार आहे.

मुख्यालय सोडण्यासही मनाई

निलंबनाच्या कालावधीत डॉ. वर्षा लहाडे यांचे मुख्यालय जिल्हा रुग्णालय, गोंदिया येथे राहणार असून, सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच निलंबन काळात शासनाच्या नियमानुसार त्यांना निर्वाहभत्ता व इतर पूरक भत्ते देण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हा आदेश जारी करण्यात आला असून, कार्यासन अधिकारी अनिल महादेव कुमेरिये यांनी तो डिजिटल स्वाक्षरीने जारी केला आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker