ताज्या घडामोडी

राजेंद्र सोनटक्के यांचा विशेष सन्मान

कला व संस्कृती क्षेत्रातील प्रेरणादायी योगदानाची दखल; ब्रह्माकुमारीजतर्फे स्मृतिचिन्ह प्रदान

चंद्रपूर, प्रतिनिधी :-

१३ सप्टेंबर २०२६ रोजी ब्रह्माकुमारीज, चंद्रपूर क्षेत्र व कला आणि संस्कृती विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात चंद्रपूर, गडचिरोली व वणी क्षेत्रातील प्रसिद्ध शीघ्र कवी, मूल्य लेखक, कलाकार व गायक आदरणीय राजेंद्र सोनटक्के यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कला व संस्कृती क्षेत्रातील त्यांचे समर्पण, सेवाभाव तसेच प्रेरणादायी योगदानाची दखल घेत ब्रह्माकुमारीजच्या कला व संस्कृती विभागाचे कार्यालय समन्वयक आदरणीय जगदीश भाई यांच्या हस्ते त्यांना विशेष सन्मान स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.

राजेंद्र सोनटक्के हे ब्रह्माकुमारीजच्या आरईआरएफ कला व संस्कृती विभागाचे सक्रिय आजीवन सदस्य असून कला, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रमांतून योगदान देत आहेत.

यावेळी जागतिक संस्कृती व पर्यावरण संरक्षण आयोगाचे राष्ट्रीय सदस्य माननीय डॉ. बी.के. नरेंद्र सी. पाहुने तसेच बी.के. कुंदा बहनजी, महाराष्ट्र क्षेत्रीय समन्वयक, कला व संस्कृती विभाग, ब्रह्माकुमारीज, चंद्रपूर क्षेत्र यांच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.

या गौरवपूर्ण सन्मानाबद्दल राजेंद्र सोंटक्के यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker