आपला जिल्हाताज्या घडामोडी
गडचिरोलीत ‘इंटेलिजन्स ब्युरो’ होणार अधिक सक्षम!
कार्यालयीन इमारतीसाठी शासनाकडून ५०० चौ.मी. जागा मंजूर

गडचिरोली,प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्ह्याच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण प्रशासकीय निर्णय घेण्यात आला आहे. गडचिरोली तालुक्यातील मौजा सोनापूर येथील शासकीय जमीन ‘सहायक मध्यवर्ती इंटेलिजन्स अधिकारी’ (ACIO) यांच्या कार्यालयीन इमारत बांधकामासाठी मंजूर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने ११ मार्च २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत शासन ज्ञापन (Order) निर्गमित केले आहे.
या बाबत महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
सोनापूर येथील सर्वे नंबर १३५/१ मधील एकूण १६.६२ हेक्टर आर क्षेत्रापैकी ५०० चौरस मीटर जागा या विशेष प्रयोजनासाठी देण्यात आली आहे. ही जमीन ‘महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६’ आणि ‘जमीन विल्हेवाट नियम १९७१’ मधील तरतुदींनुसार मंजूर करण्यात आली आहे. चालू ‘रेडी रेकनर’ दराप्रमाणे किंमत आकारून या जमिनीचे वाटप करण्यात आले आहे.
शासनाच्या अटी व शर्ती:-
शासनाने ही जमीन मंजूर करताना काही कडक अटी घातल्या आहेत:
ताबा आणि वापर: जमिनीचा ताबा मिळाल्यापासून ३ वर्षांच्या आत प्रत्यक्ष वापर सुरू करणे बंधनकारक आहे.
हस्तांतरण बंदी: शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय ही जमीन विकता येणार नाही, गहाण ठेवता येणार नाही किंवा भाड्याने देता येणार नाही.
या जागेचा वापर केवळ मंजूर कामासाठीच (कार्यालयीन इमारत) करणे अनिवार्य असेल.



