लॉयड्स मेटल्सच्या व्हॉलीबॉल व ग्रामीण कबड्डी संघांचे जिल्हास्तरीय विजेतेपद

गडचिरोली, प्रतिनिधी :-
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या क्रीडा संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत दुहेरी विजेतेपद पटकावले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील गोवारी येथे आयोजित जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत लॉयड्स व्हॉलीबॉल संघाने १६ संघांचा पराभव करत अंतिम सामन्यात १५–१० असा ठोस विजय नोंदवून विजेतेपद मिळवले.
तसेच, पारसलगोंडी येथील लॉयड्स ग्रामीण कबड्डी संघाने आलेंगा येथे झालेल्या जिल्हास्तरीय ग्रामीण कबड्डी स्पर्धेत ४५ संघांवर मात करत अपराजित राहून विजेतेपद पटकावले.
लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या माध्यमातून ग्रामीण व तळागाळातील युवकांना दर्जेदार प्रशिक्षण व क्रीडा संधी उपलब्ध करून दिल्या जात असून, या यशातून अकादमीच्या संरचित क्रीडा विकास उपक्रमांचे फलित स्पष्ट झाले आहे.
या विजयामुळे खेळाडूंसह स्थानिक परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातील गुणवंत खेळाडू घडवण्यासाठी अकादमीचा संकल्प अधिक बळकट झाला आहे.



